By Vishruti
त्याचे ते निरागस डोळे, मनातील निरागसता दिसते त्यात,
त्याचे ते बोलके डोळे, जिभेच्या आधीच व्यक्त करतात त्याचे भाव,
त्याचे ते हसरे डोळे, हसल्यावर बाकीचं सर्व विसरण्यास पाडतात भाग,
त्याचे ते गूढ डोळे, कितीतरी गोष्टी लपवलेल्या आहेत त्यात,
त्याचे ते प्रेमळ डोळे, जगाला पुरून उरेल इतकं प्रेम आहे त्यात.
त्या निरागस डोळ्यांची निरागसता जपायची आहे तिला,
त्या बोलक्या डोळ्यात कधीही दुःख नकोय तिला,
त्या हसऱ्या डोळ्यांत आयुष्यभर हरवून राहायचं आहे तिला,
त्या गूढ डोळ्यातील गुपितं जाणून घ्यायच आहे तिला,
पण काहीच होऊ शकत नाही,
कारण त्या प्रेमळ डोळ्यात मैत्रीच्या पलीकडे कधी प्रेम दिसलंच नाहीये तिला.
By Vishruti
Comments